
हिरेबागेवाडी – तेली समाजबांधवाना आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सहकार्य करू, शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले जाईल असे बेळगावी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
हिरेबागेवाडी येथे गुरुवारी बेळगावी तालुका तेली विकास संघटनेच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले सरकारच्या योजनेंतर्गत तेली समुदाय भवन निर्मिती करणार असल्याची ग्वाही दिली.
बेळगावी खासदार मंगल अंगडी बोलताना म्हणाल्या केंद्र सरकारच्या मागासवर्गीय यादीत तेली समाज असून, केंद्रात अनेक रोजगाराच्या संधी आहेत. या योजनांचा समाजाने लाभ घ्यावा असे सांगितल्या.
यावेळी बेळगावी जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष रमेश उटगी बोलताना म्हणाले शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रात आपला समाज मुख्य वाहिनीत येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने संघटीत प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी सिद्धानंद गुरुजी ज्ञान मंदिर, गिरीष आनंद गुरुजी, सद्गुरू नागेंद्र महास्वामीजी, शिवमूर्ती देवरू, भीम आजोबा, उळवप्पा आजोबा, सी सी पाटील, नाजरीन करीदावल, श्रीकांत मदुभरमनवर, फकिरप्पा शिवरुद्रप्पा गाणगी, राजू टोपनवर, शोभा गाणगी, गूळप्पा होसमनी, आडीवेश इटगी, स्वाती इटगी, ईश्वर जमखंडी, फकिरप्पा गाणगी, तमना गानगी, गंगाधर अगसीमनी, महेश गाणगी, सुरेश इटगी, इरप्पा ईटी, रवी गाणगी आदी उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ