स्वतःबरोबर इतरांच्या दुःखात सहभागी होऊन समाज कार्याला वाहून घेतले पाहिजे-चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी
प्रगती वाहिनी न्यूज,अंकली प्रतिनिधी:
मानव जन्माला आल्यानंतर समाजाचे देणे लागतो समाजाच्या देण्यातून मुक्त होण्यासाठी परोपकारी जीवन जगून समाज कार्य केले तरच मानवी जीवन सार्थक ठरते त्यासाठी प्रत्येकाने स्वतःबरोबर इतरांच्या दुःखात सहभागी होऊन समाज कार्याला वाहून घेतले पाहिजे असे प्रतिपादन श्रीशैल पिठाचे जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले
मांजरी तालुका चिकोडी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एकता सोशल फाउंडेशन च्या उद्घाटन समारंभ व कोरोना वारियर्स यांच्या सत्कार समारंभाच्या दिव्य सानिध्यातुन स्वामीजी बोलत होते
या समारंभात मांजरी येथील काडसिद्धेश्वर संस्थान मठाचे गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी अंबिका नगर चे अंबिका शिवाचार्य स्वामीजी यांच्याबरोबरच भारतीय जीवन विमा निगम चे अधिकारी आनंदअारवारे शिरगुप्पी ग्रामपंचायत सदस्य रामगोंडा पाटील अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार लक्ष्मणप्पा आरी हे प्रमुख पाहुणे तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी मांजरी ग्रामपंचायत अध्यक्ष सौ माया भिलवडे या होत्या
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत डॉक्टर विजय उपाध्ये यांनी केले प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग माने यांनी केले एकता सोशल फाउंडेशन चे उद्घाटन जगद्गुरु यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले यावेळी कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी परिश्रम घेतलेल्या मांजरी येथील स्थानिक वैद्यकीय मंडळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारीवर्ग अंकली पोलीस स्थानकाचे कर्मचारी व स्थानिक युवक स्वयंसेवकांना स्वामीजींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले त्याचबरोबर कोरूना रोगाच्या प्रतिबंधासाठी परिश्रम घेतलेल्या आशा कार्यकर्त्यांचा प्रशस्तीपत्र व सहाय्य देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास सदलगाचे माजी आमदार कल्लाप्पांना मगेनवर मांजरी ग्रामपंचायत सदस्य बबनराव भिलवडे सिद्धार्थ गायकवाड सुभाष नरवाडे
डॉक्टर दिलावर शिरगुप्पे डॉक्टर शाम पाटील डॉक्टर रमेश खिचडे डॉक्टर जे बी माने डॉक्टर ऋषभ कोठीवाले डॉक्टर के टि हरारी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव यांच्यासह एकता सोशियल फाऊंडेशनचे सर्व सदस्य ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सुधीर कोठेवाली यांनी केले
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ