
महिला, मुलांसह सुमारे 40 हुन अधिक जणांना जमवून प्रार्थना
प्रगतिवाहिनी न्युज / उडुपी –
धर्मांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून एका इमारतीत सुरू असलेल्या प्रार्थनास्थळावर हिंदू जागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली.

हिंदू जागरण समितीचे प्रमुख प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली. अचानक धाडीमुळे प्रार्थनेला उपस्थित्यांच्यात एकच गोंधळ उडाला. लागलीच घटनास्थळी पोलिस दाखल होऊन समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली. कोरोना मार्गसुचीचे उल्लंघन करून प्रार्थना करणाऱ्याना धारेवर घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकार गणेशोत्सव साजरा करण्यास अनेक जाचक अटी, नियम केले आहे. पण अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालत नाही. त्वरित यांच्यावर कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या घटनेस सरकार जबाबदार असेल असा इशारा हिंदू जागरण समितीने दिला आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ