Latest

सावधान ! पुन्हा फैलावतोय डेंग्यू , चिकनगुणिया

प्रगतिवाहिनी न्युज / बेंगळुरू – 
राज्यात कोरोना तिसरी लाट येण्याची भीती असताना निफा व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. यात डेंग्यू व चिकनगुणिया प्रकरणात वाढ झाली आहे.
कोरोना रोग, डेल्टा, डेल्टा प्लस रोगांचा प्रसार झाला असताना आता निफाचे संकट निर्माण झाले आहे. अशा कठीण स्थितीत डेंग्यू केस वाढत असून, मागील एका महिन्यात राज्यात 893 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. विशेष म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या बेंगळुरात सर्वाधिक प्रकरणाची नोंद झाली आहे.
बेंगळुरात 446 डेंग्यू प्रकरणांची नोंद झाली आहे. शिमोगा 202, उडुपी 293, कलबुर्गी 280, दक्षिण कन्नड 178, कोप्पळ 150, दावनगेरे 120, बल्लारी 113, हावेरी 100 डेंग्यू केसची नोंद झाली आहे. राज्यात डेंग्यू प्रकरणांची संख्या 2736 वर वाढली आहे.
तसेच चिकणगुणिया रुग्णांच्या संख्येने वाढ झाली आहे. कलबुर्गी 121, कोलार106, शिमोगा 93, तुमकुर 68, विजयपूर 66, यादगिरी 51, बेंगळुरू 51 चिकणगुणिया प्रकरणांची नोंद झाली आहे. राज्यात चिकनगुणिया रुग्णांची संख्या 918 इतकी झाली आहे.

बेळगावीत कोरोनाची कमालीची वाढ

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button