Kannada NewsKarnataka News

बेळगावी पालिका आदर्श करण्यासाठी अभय पाटील फॉर्म्युला

कोणताही अभ्यास दौरा स्वखर्चाने करणार

प्रगतिवाहिनी न्युज / बेळगावी
बेळगावी महानगरपालिका राज्यात आदर्श महानगरपालिका करण्याची योजना अभय पाटील यांनी आखली असून, यासाठी काही फॉर्म्युला सादर केले आहेत.
रविवारी मिलेनियम गार्डन येथे बेळगावीच्या विविध संघटनासोबत नूतन नगरसेवकांचा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
शहरातील संघ संस्था अनेक समस्या सांगितल्या. सर्व समस्या समोर ठेऊन क्रियायोजना तयार करणार असल्याचे सांगितले.
,बेळगावीला राज्य व केंद्र सरकारकडून शक्य तितका निधी आणला जाईल. निवडून आलेल्या नगरसेवकांना चांगली संधी लाभली आहे. सर्वांनी मिळून केवळ भाजपा नगरसेवक इतके नसून सर्व नगरसेवकाना मिळून काम करण्याची गरज असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.
बेळगावी महानगरपालिकेच्या नूतन सदस्यांना त्यांचे कर्तव्य कामाबद्दल 2 दिवशीय कार्यगार आयोजणार असल्याचे सांगितले.
देशात आदर्श पालिका असलेल्या इंदोर, नागपूर व सुरतला नगरसेवकांना घेऊन जाणार आहे. पण यासाठी खर्च पालिका करणार नाही. कोणताही अभ्यासदौरा स्वखर्चाने करण्यात येईल असे अभय पाटील यांनी जाहिर केले.
खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके उपस्थित होते.
प्रारंभी विविध संघ संस्थाचे प्रतिनिधी बेळगावीत आवश्यक कामे लक्षात आणून दिले. नगरसेवकाच्या बाजूने वाणी विलास जोशी व मंगेश पवार बोलले.
बेळगावी फोरम ऑफ असोसीएशन ( F O A B ) चे संवाद कार्यक्रमाला प्रायोजकत्व मिळाले.

कोयना धरणात 103.19 टीएमसी पाणी साठा

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button