Ghataprabha

बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

बेळगावी जिल्ह्यात एकाच दिवशी 27 प्रकरणे तर राज्यात 1839

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी,: बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण ७० वर्षाचा तर दुसरा ४८ वर्षाचा आहे. या दोन मृत्यूंनी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
रायबाग तालुक्यातील कुडची येथील ७० वर्षीय वृद्धाचा पहिल्यांदा मृत्यू झाला आहे . आज मध्यरात्री २.३० वाजता त्या वृद्धास श्वसन आणि बरख्याचा त्रास जाणवल्याने त्याला दाखल करण्यात आले होते यामुळे सायंकाळी ५.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. तसेच वीरभद्र नगर येथील ४८ वर्षीय इसमाचा सायंकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला. त्याला काल रात्री ११ वाजता दाखल करण्यात आले होते.हे दोन मृत्यू खळबळ माजवणारे आहेत
बेळगावी 11 जण, अथणी येथे 12, सवादत्ती 3 आणि खानापूर येथे 1 कोरोना रुग्ण आढळला आहे.
कर्नाटकात एकूण 42 जणांचा आज मृत्यू झाल्याचे समजते.