Advertisement -Home Add

निरोगी समाज निर्माणासाठी योग आवश्यक: मोदी

कोरोना वायरसच्या लढ्यामध्ये योग परिणामकारी

प्रगती वाहिनी न्यूज, न्यू दिल्ली: आज आंतरराष्ट्रीय योग दिन कोरोनाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना सार्वजनिकरित्या योग दिन साजरा न करता आपापल्या घरी योग दिन साजरा करावा असे आव्हान केले होते.

देशभरात सकाळी सात वाजता प्रधानमंत्री यांनी दिल्लीतील लोक कल्याण मार्ग या प्रधानमंत्री निवासात मोरारजी देसाई राष्ट्रीय योग अकॅडमी सोबत योगाभ्यास केला . आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला आपल्या निरोगी आरोग्यासाठी आणि मानसिक संतुष्टीसाठी योग आवश्यक आहे. आपल्या शरीरातील इम्मुनिटी पॉवर वाढवण्यास ही योग चांगली सेवा बजावतो, यामुळे कोरोना रोगावर ही ही नियंत्रण ठेवता येते यासाठी सर्वांनी दररोज आपल्या कुटुंबासोबत घरीच योगासन करावे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.