Kannada NewsKarnataka NewsLatest

पुढील महिन्यात भेटणार महापुरा संबंधी राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री

प्रगती वाहिनी न्यूज, सांगली: मागच्या वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी महापुराचा विपरीत परिणाम उपभोगल्याने दोन्ही राज्यांनी एकत्रित येऊन येणाऱ्या महापुरा बद्दल उपायोजना करण्यासाठी ही भेट अत्यावश्यक ठरणार आहे. महाराष्ट्राच्या काही अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी झालेल्या महापुरा मध्ये अडकून असलेल्या गावांना भेटी दिल्या यामध्ये कृष्णा वारणा पंचगंगा आणि कोयना या नदीकाठच्या भागांना भेट देऊन पाहणी केली.
सातारा आणि कोल्हापूर राज्यातील 14 आमदार 4 खासदार आणि सात मंत्र्यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र  पाटबंधारे मंत्री जयंत पाटील कोल्हापूर मध्ये बोलत होते. मागच्या वर्षी दोन्ही राज्यांनी महापुराचा जोरदार फटका बसल्यामुळे भरपूर नुकसान सोसावे लागला आहे या वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास यावर दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे येऊन तोडगा काढावा यासाठी ही बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि आणि मी मी पुढील महिन्यात कोल्हापूर येथे भेटणार असून यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा मुंबई किंवा बेंगलोर येथे हे भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कोल्हापूर सांगली सातारा आणि इतर नदीकाठच्या
जिल्ह्यांचे मागच्या वर्षी महापुरामुळे भरपूर नुकसान झाले आहे. गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्र आणि कर्नाटकाने असा महापूर कधीच पाहिला नव्हता यामध्ये जीवित हानी बरोबरच कोट्यावधी रुपयांचे नुकसान ही सहन करावे लागले. कित्येक एकर पिकाऊ जमीन महापुरा मध्ये उडून गेली. महापुरा चा झटका इतका मोठा होता की नदी काटा शिवाय शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही पाण्याची पातळी वाढल्याने दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागले.

Related Articles

Back to top button