
प्रगतीवाहिनी न्यूज / बेळगावी –
महापुराने खराब झालेली रस्ते दुरूस्तीसाठी निधी मंजूर न केलेल्या राज्याच्या भाजपा सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते आंदोलन करणे हास्यास्पद असल्याचे तालूका पंचायतीचे माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी सांगितले.
बेळगावी ग्रामीण मतदारसंघातील रस्ते महापुराने खराब झाले आहेत. बहुतांश रस्ते आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध योजनातुन निधी आणून विकास केला आहे. चार रस्ते मात्र निधीअभावी अजून काम प्रलंबित आहे. यासाठी देखील निधी आणण्यासाठीआमदार प्रयत्न करीत आहेत.
सरकार या रस्त्यासाठी निधी न दिल्याचा निषेध करून आता भाजपा कार्यकर्ते बॅनर लावणे, दगड माती टाकून मुजविण्याचे नाटक करून आंदोलन करीत आहेत. आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत आता तरी सरकार जागे होऊन त्वरीत निधी मंजूर करणे योग्य असल्याचे सांगितले.
उचगाव – अतिवाड , बेनकनहळी- बेळगुंदी, हलगा- तारीहाळ, बसापूर-मोदगा या चार रस्ते वगळल्यास संपूर्ण ग्रामीण मतदारसंघात आमदाराच्याविरुद्ध बोलण्यासाठी कार्यकर्त्यांकडे दुसरे काही नाही आहे. सर्व कांही विकास आमदारानी केला आहे. शेतमळ्याना जाणाऱ्या रस्त्यांसाठी विकास करण्यासाठी आमदारानी काम हाती घेतले आहेत.
महापुराने खराब झालेली रस्त्याना निधी मंजूर करावे अशी विनंती बेळगावी जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे केले आहेत. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता भाजपा कार्यकर्ते आंदोलन करून मंत्री, सरकारचे अपयश लोकांना दाखवून दिले आहेत. हे नागरिकांना कळून चुकले आहे असे सांगितले.
महापूर , कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत इतिहासात पहिल्यांदा बेळगावी ग्रामीण मतदारसंघ विकास झाल्याचे लोक पाहत आहेत. संपूर्ण मतदारसंघ आपले कुटुंब समजून प्रतिसाद देत असल्याचे पाहून नागरिक आनंदी आहेत. हे सर्व पाहून भाजपावाल्याना सहन होत नाही. स्वतःच रात्री अशोभनीय बॅनर बांधून मराठी भाषिक वाईट असल्याचे सांगून मराठी भाषिकांचे नाव खराब करीत असल्याचा आरोप शंकरगौडा पाटील यांनी केला.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ