प्रगती वाहिनी न्यूज, न्यू दिल्ली: सर्व सहकारी बँका भारतीय रिझर्व बँकेच्या आधीन आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.
राष्ट्रीय बँकाला लागणारे सर्व कायद्याप्रमाणे शहर सहकारी बँक तसेच आंतरराज्य सहकारी बँका आरबीआयच्या व्याप्तीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे 1,482 शहर सहकारी बँका तसेच 58 अंतर राज्य सहकारी बँकांकडे 8.6 कोटी ठेवी असल्याचे ते म्हणाले.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्यामुळे या सर्व सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणात आणण्याची मागणी मागे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ परिषदेत करण्यात आले होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ