
भाजपाला कार्यकर्त्यांचे बळच मजबूत शक्ती : खासदार अण्णासाहेब जोले
प्रगतिवाहिनी न्यूज / बेळगावी –
निपाणी मतदारसंघातील 9 कॉंग्रेस नेत्यांनी आज चिकोडी खासदार अण्णासाहेब जोलेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.
केंद्र व राज्य सरकारची विकासकामे पाहून शेंडूर गावचे तानाजी शिंदे, माजी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी बोगाळे, पांडुरंग कांबळे, चंद्रकांत मुसळे, अरविंद सूर्यवंशी, मंदार खर्डे, सुनिल नरके, भैरू कांबळे, बाबुराव तोडकर यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यानी भाजपा खासदार अणासाहेब जोले यांनी स्वागत करून घेतले.
यावेळी बोलताना आण्णासाहेब जोले म्हणाले केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी जाऊन पोचत असल्याचे हे एक उत्तम उदाहरण , प्रत्येक कार्यकर्त्याला आदराने पहिला जाणारा आपला पक्ष , त्यामुळे लोकांच्या हितासाठी परिश्रम करत असलेल्या भाजपात इतर पक्षाचे कार्यकर्ते येत असणे स्वागतार्ह असल्याचे सांगितले.
याप्रसंगी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एम पी पाटील, जि प सदस्य सिदु नराटे, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे सदस्य प्रकाश शिंदे, भाजपा ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, ढवणे सर, बंदूक (मलगोंडा ) पाटील , आत्माराम चौगुले, प्रवीण गिरी, संतोष नाईक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ