हिरेबागेवाडीच्या विकासासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बनविल्या अनेक योजना
प्रगतीवाहिनी वार्ता; हिरेबागेवाडी; हिरेबागेवाडी गावातील जगन्माता श्री जाली करेम्मा. मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त आयोजिलेल्या समारंभामध्ये, लक्ष्मीताई को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आणि हर्ष शुगरचे निर्देशक चन्नराज हट्टीहोळी यांनी भाग घेतला.
अतिशय सुंदरपणे दरवर्षी साजरा केला जाणाऱ्या या उत्सवामध्ये सहभागी होणे ही भाग्याची गोष्ट आहे. येथील जनतेवर जाली जाली करेम्माची सदा कृपादृष्टी असू दे, अशी प्रार्थना चन्नराज हट्टीहोळी यांनी केली.
हिरेबागेवाडी म्हणजे बेळगावीचे प्रवेशद्वार आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यानी, आमदार झाल्यानंतर ग्रामविकासाचे अनेक कार्यक्रम उपयोजीले आहेत. येथील जनतेने सहकार्य, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळे हे साध्य झाले आहे.
हिरेबागेवाडीचा आदर्श गाव बनविण्यासाठी आणखी योजना अमलात आणण्याचा निर्धार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे, असे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
जाली करेम्मा देवीचे उपासक, उळवेप्पा आजोबा, श्री नागेन्द्र महास्वामी, अरळीकट्टीचे तोंटदार्य श्री शिवमुर्ती देव (विरक्त मठ), श्री शिवानंद शिवाचार्य, केदार पीठ, मुतनाळ, यांच्या दिव्य सान्निध्यात सर्व कार्यक्रम पार पडले.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिक बी एन पाटील. श्रीकांत मदुभरमण्णावर. सुरेश इटगी, गौस जालीकोप्प, अडिवेश इतगी, एन एफ कंठी, ईराण्णा अरळीकट्टी, बसनगौडा पाटील, बसवराज हुलमनी, अनिल पाटील, एन सी पाटील, अडिवेप्पा तोटगी, संतोष काकती, मंजू कुंभार इत्यादी उपस्थित होते.
मतदारांना पंतप्रधान मोदींचा फोटो असलेली चिठ्ठी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आक्रोश
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ