
प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; निपाणीच्या जवाहर तलावाच्या परिसरात उद्यान निर्मिती आणि सुशोभीकरण कार्याला प्रारंभ केला आहे. देशाची संस्कृतीविवरण करणाऱ्या अनेक मूर्ती येथे पाहायला मिळणार आहेत.
महिला आणि बालकल्याण खात्याच्या पाच कोटी रुपयांच्या अनुदानातून बालभवन निर्मिती करण्यात येणार आहे. असे मुजराई, वक्फ आणि हज मंत्री, शशिकला जोल्ले यांनी सांगितले. 15 व्या वित्त आयोगाच्या 2020- 21 सालच्या अनुदानातून 30 लाख रुपये खर्चून उद्यान निर्मिती, आणि 14 लाख रुपये खर्चाने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, मंगळवारी या कामाला चालना देऊन त्या बोलत होत्या. म्हैसूर राज्यातील विविध उद्यानांचा विकास करणाऱ्या बागायत खात्याची उपसंस्था नर्सरी मेन को-ऑपरेटिव्ह, या संस्थेला हे काम सोपविण्यात आले आहे.
