Kannada NewsKarnataka NewsLatest

पाच दिवसांच्या गणेशोत्सवाला बेळगावी महामंडळाचा विरोध

शासनाला त्वरित अहवाल सादर करणार : जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ

प्रगतीवाहिनी न्युज / बेळगावी –    बेळगावी शहरातील गणेशोत्सव महामंडळाने एकजुटीने  मागणी केल्याप्रमाणे गणेशोत्सव पाच दिवसाऐवजी दहा दिवस साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी याविषयी शासनाला त्वरित अहवाल पाठविला जाईल. याविषयी अंतिम सरकारने दिलेला आदेशाचे सर्वांनी पालन करावे असे जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी सांगितले.
      आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गणेशोत्सव साजरा करण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
      गणेशोत्सव कांही दिवसावर असताना एकाच छताखाली सोय करून गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानगी देण्यासाठी संबंधित खात्याच्या समन्वयाने चर्चा करून त्वरित एकाच छताखाली सोय करण्यात येईल अशी ग्वाही  जिल्हाधिकाऱ्यांनी  दिली.
     गणेशोत्सव साजरा करण्याविषयी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव काळात कोव्हीड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 20 हुन अधिक लोक एकीकडे जमा होऊ नयेत. आयोजकांनी लस घेतली नसल्यास आरोग्य खात्याकडून लस उपलब्ध करून देण्यात येईल.
सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमावर बंदी : 
  गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, डीजे, नृत्य व इतर मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
 गणेश प्रतिष्ठापना व विसर्जनावेळी मिरवणुकिवर बंदी घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी स्पष्ट केले.
    पालिकेने ठरविलेल्या ठिकाणी मात्र विसर्जन करण्याची सोय केली आहे. उपनगरात मोबाईल टॅंक पुरविण्यात येईल. कृत्रिम टॅंक देखील पालिकेकडून उभारले जाणार आहेत. गणेशोत्सव ठिकाणी कोव्हीड नियमांचे पालन करावे. गर्दी होऊ नये याची खबरदारी आयोजकांनी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर सक्तीचे करावे. सरकारचे नियमांचे सर्वांनी पालन करावे.आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्याचा आदेश नियमामध्ये  कळविण्यात आले आहे.
     सर्व गणेशोत्सव महामंडळानी सहकार्य करावे. शेजारच्या महाराष्ट्र राज्यात दिन दिवसापासून कोव्हीडचे प्रमाण वाढले आहे. कोव्हीड नियंत्रणाच्या दृष्टीने मात्र सरकार नियमावली जाहीर केली आहे.  त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून कोव्हीड नियंत्रनासाठी सहकार्य करावे अशी विनंती जिल्हाधिकारी एम. जी.हिरेमठ यांनी केले.
पाच दिवसाच्या गणेशोत्सवाला विरोध : 
   बैठकीत बोलताना लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव म्हणाले, कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेले नियम दोन वर्षांपासून पाळत आहोत. पण यंदा पाच दिवस मात्र उत्सव साजरा करण्यास आपला विरोध असल्याचे सांगितले.
   तसेच कोव्हीड लसीकरण करणे यासह सर्व नियमांचे पालन केले जाईल. पण परंपरेप्रमाणे दहा दिवस साजरा करण्यास संधी द्यावी अशी विनंती केली.
   पाच दिवसांचा गणेशोत्सवला मात्र परवानगी दिल्याने गोंधळ निर्माण झाला असून तो सोडवावा असे सरकारकडे विनंती केली.
   यावेळी शहापूर विभागाचे नेताजी जाधव बोलताना म्हणाले गणेशोत्सव पाच दिवसांचे बंधनकारक केल्याने संताप व्यक्त होत आहे. उत्सव कांही दिवसावर असताना अशाप्रमाणे मर्यादा आणल्यास परंपरेला फाटा दिल्यासारखे होईल. यामुळे याविषयी त्वरित निर्णय जाहीर करून अन्य नियमानुसार उत्सव साजरा करण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली.
  एकाच छताखाली गणेशोत्सवाला आवश्यक परवानगी देण्याची मागणी विविध महामंडळ पदाधिकाऱ्यांनी केली.
   हिंदू भक्तांची परंपरा, संप्रदाय व भावना लक्षात घेऊन पाच दिवसाऐवजी दहा दिवस उत्सवाला परवानगी द्यावी अशी एकजुटीने मागणी करण्यात आली.
   पोलीस आयुक्त डॉ.के.त्यागराजन, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन, बेळगावी पोलीस उपायुक्त डॉ.विक्रम आमटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त डॉ रुदरेश घाळी व इतर उपस्थित होते. बेळगावी महानगरातील विविध गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, महानगरपालिका, पोलिससह विविध खात्याचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button