Kannada NewsKarnataka News

घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी अनंत लाड यांची निवड

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी – श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट, हिंदवाडी च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री अनंत लाड यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष संभाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री चंद्रकांत बांडगी यांची उपाध्यक्षपदी तर उद्योजक कुलदीप भेकणे यांची चिटणीस पदी निवड झाली आहे. याप्रसंगी सर्वश्री गोपाळ बिर्जे, रघुनाथ बांडगी, रामभाऊ कुट्रे व नेताजीराव जाधव यांची अभिनंदनपर भाषणे झाली’ सर्वांच्या सहकार्याने आपल्या एक वर्षाच्या कारकीर्दीत विविध उपक्रम राबवून यशस्वी करू” असा विश्वास अनंत लाड यांनी व्यक्त केला
अनंत लाड हे निवृत्त शिक्षक व आनंद ॲडव्हर्टायझिंग या जाहिरात वितरण संस्थेचे प्रमुख असून गेल्या अनेक वर्षांपासून मारुती मंदिराचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत .आधार सोसायटी चे संस्थापक, पायोनियर अर्बन बॅंकेचे विध्यमान संचालक,जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन ) व जिल्हा मराठी पत्रकार संघ आदी संस्थांचे अध्यक्ष पद भूषविले असून बेळगाव जेसीज आणि बेळगाव मराठा जागृती संघ आदी संस्थांमध्ये कार्यरत आहेत .श्री चंद्रकांत बांडगी हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट असून युनियन जिमखाना बेळगाव चे विद्यमान अध्यक्ष आहेत तर कुलदीप भेकणे हे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत या सर्वांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध आहे
या बैठकीला बाबुराव पाटील ,चंद्रकांत पवार ,मोहन मेलगे , प्रकाश माहेश्वरी व ऍड के ए साळवी आदी संचालक उपस्थित होते

Home add -Advt

Related Articles

Back to top button