प्रगती वाहिनी न्यूज , न्यू दिल्ली: लॉक डाऊनच्या थोड्या नियमातील शितीलथे नंतर देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस जास्त होत असून चार लाखा नजदीक ही संख्या जाऊन पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात 14 हजार 516 नवीन प्रकरणे आढळले असून देशात करोना पीडितांची संख्या तीन लाख 95 हजार 48 इतकी झाली आहे.
एकाच दिवशी 375 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.यामुळे देशातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 12948 इतकी झाली आहे. आतापर्यंत दोन लाख 13 हजार 831 जण कोरणा मुक्त झाले असून एक लाख 68 हजार 269 जण कोरोनाचा उपचार घेत आहेत अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
भारतामध्ये मे 30 नंतर दररोज आठ हजार , जून 3 नंतर दररोज नऊ हजार तसेच जून 11 नंतर दररोज दहा हजाराहून जास्त करोना केसेस वाढत आहेत. जून 12 ते 17 दरम्यान 12000 केस तर जून 18 पासून तेरा हजाराहून अधिक प्रकरणे समोर आले आहेत.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ