Kannada NewsKarnataka News

भारत-चीन संघर्ष सर्वपक्षीय सभेला सुरुवात

प्रगती वाहिनी न्यूज, दिल्ली: भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाले असल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय सभा होणार आहे या सभेमध्ये सरकारच्या राज्य तांत्रिक आणि भारतीय सेनेच्या प्रयत्न बाबत सर्वपक्षीय सभेमध्ये एक मताने निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जून पंधरा तारखेला रात्री लदाक येथील गलवान वेलीमध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत 20 भारतीय सैनिक मरण पावले होते याबाबत कठोर निर्णय घेण्यासाठी ही आज सर्वपक्षीय सभा बोलवण्यात आली आहे.
सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध पक्षाच्या प्रमुखांना गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या घटनाक्रमाबद्दल तसेच सरकारने योजलेल्या योजना बद्दल माहिती देणार आहेत. आणखीन परराष्ट्रमंत्री एस जय शंकर हे यावेळी नेत्यांना सीमा वादातील निष्कर्षांच्या प्रयत्नाबद्दल संक्षिप्त माहिती देतील.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button