प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: विविध विभागाची खाती ,राज्यस्तरीय कार्यालये सुवर्ण सौदला स्थळांतरीत करावी अशी उत्तर कर्नाटक जनतेच्या कित्येक दिवसांच्या मागणीची अंमलबजावणी म्हणून येथील सुवर्ण सौद येथे कर्नाटक माहिती आयोग बेळगावी यांनी आपले काम सुरु केले आहे.
याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषदेत कर्नाटक माहिती आयोगाचे आयुक्त गीता बी वि यांनी माहिती दिली. आयोगाच्या कामाला जून 22 तारखेपासून सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आयोगाचे कामकाज मार्च तीन तारखेपासून सुरू होणार होते पण कोरोनामुळे यासाठी उशीर झाला.
सरकारची आणि उत्तर कर्नाटकच्या जनतेच्या मागणीनुसार हे कार्यालय येथे सुरू करण्यात आले आहे .या कार्यालयाची ची सुरुवात करण्याची संधी निर्माण केलेल्या मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे त्यांनी आभार मानले.
या माहिती आयोगाच्या व्याप्तीत बेळगाव विभागाअंतर्गत सात जिल्हे येणार असून या विभागात एकूण चार हजार प्रकरणे इत्यर्थ होण्याची बाकी असल्याचे गीता यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने पहिल्यांदा जुन्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्वरित प्रकरणे सोडवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
अधिवेशन काळात आयोगाचे कामकाज होणार नसून या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागृती कार्यक्रम आयोजन करण्यात येईल. अधिवेशनाच्या काळात त्या-त्या जिल्ह्यां मधून कामकाज करण्यात येईल. या अगोदर बंगलोरहून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रकरणे सोडण्यात येत होती.
आयोगाच्या कामकाजासाठी शाखाधिकारी आणि सचिव नेमणे आवश्यक ते असून याबाबत सरकारला पत्रही लिहिण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सुवर्ण सौद्यसाठी बस सेवा:
सुवर्ण सौद शहरापासून दूरवर असल्यामुळे सध्या दररोज तीन बस ची व्यवस्था केली आहे. माहिती आयोग कार्यालयाला येताना समन्स ची प्रथम प्रत दाखविला तरच विधान सौदमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती आयुक्त गीता. बी. वि यांनी दिली.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ