प्रगती वाहिनी न्यूज ,चिकोडी: एकविसाव्या शतकात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आले असून यासाठी सर्वांनी शिक्षणासाठी प्राधान्याचा द्यावी. मुलांच्यासाठी संपत्ती न मिळवता मुलांनाच काबील बनवा असे आवाहन बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसव प्रसाद जले यांनी केले.
मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने बांधकाम खात्याच्या अनुदानातून बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा खोल्यांचा भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कन्नड सरकारी उच्च प्राथमिक शाळा खोल्यांचा निर्मितीसाठी 22 लाख रुपये मंजूर झाले असून खासदार अण्णासाहेब जोल्ले तसेच मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नांमुळे इथे अनेक कामकाज होत असून भविष्यात ही गाव सुधारण्यासाठी हवी ती काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, ग्रामपंचायती अध्यक्ष कल्पना तळसकर, चिकोडी जिल्हा भाजप उपाध्यक्ष जयवंत भाटले शहराध्यक्ष प्रणव मानवी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा कुंभार, सिद्राम पुजारी ,मोहन शितोळे, सिंगप्पा कट्टीकर, मारुती गावडे, सत्यपाल गावडे ,सहाय्यक अभियंता बीबी बेडकिहाळ, रितेश पाटील, चंद्रकांत खोत ,वसंत रेपे, राजू बरडे, ए ए गदाळे, मारुती तळसकर ,इत्यादी उपस्थित होते
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ