Advertisement

दहावीचा आणखीन एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव

बल्लारी येथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

प्रगती वाहिनी न्यूज, बल्लारी: बल्लारी जिल्ह्यात दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कोरोना झाल्याचे निश्चित झाले आहे यामुळे त्याच्यासोबत परीक्षा लिहिलेल्या इतर विद्यार्थ्यांना ही कोरोना झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दहावीची परीक्षा लिहून बाईक वर जात असताना दोघा विद्यार्थ्यांचा 25 तारखेला अपघात झाला होता. यावेळी या दोघांचीही करुणा चाचणी केली असता एकाला कोरोना झाल्याचे निदर्शनास आले होते.
कोरोना झालेला विद्यार्थी बल्लारी तालुक्यातील कपल गावचा असून बल्लारी शासकीय रुग्णालयात याच्यावर उपचार केले जात आहेत.