Advertisement -Home Add
Crease wise (28th Jan)
KLE1099 Add

काँग्रेस पक्षाला नवचैतन्य

उतर कर्नाटकात सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर पक्षसंघटना करणार

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: काँग्रेसला पुन्हा एकदा सत्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने नुतन कर्नाटक काँग्रेस प्रदेश समिती नेमली असून डीके शिवकुमार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. उत्तर कर्नाटक भागात काँग्रेस पक्ष बलवान बनवण्यासाठी सतीश जारकीहोळी यांनी कार्याध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाती घेतली असून याला ईश्वर खंड्रे तसेच सलीम अहमद यांची साथ लाभली आहे.

सतीश जारकीहोळी त्यांच्यासोबत केपीसीसी महिला घटकाच्या माजी अध्यक्षा लक्ष्मी हेबाळकर ह्या ही खंबीरपणे उभी असून पक्ष संघटनेसाठी ते एकत्रितपणे सतीश जारकीहोळी यांना सर्वतोपरी मदत करणार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर उत्तर कर्नाटकच्या लिंगायत समुदायातील प्रबळ नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या चाणाक्ष त्यामुळे त्यांनी महिला राज्य अध्यक्षपदी भूषविलेले आहे.या सर्वांचा अनुभव आता पक्ष संघटनेवर होणार असून राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस सरकार सत्तेवर येण्यासाठी सर्व तयारी त्यांनी केलेली आहे.
डीके शिवकुमार यांच्या नेतृत्व तयार झालेल्या टीम मध्ये सतीश जारकीहोळी हे मागासवर्गीय नेते असून त्यांचा या भागात चांगला प्रभाव आहे तर लिंगायत समुदाय लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठिंबा देतोच.
लक्ष्मी हेब्बाळकर यांची संघटन कौशल्य व चाणाक्षता पाहून येणाऱ्या काही दिवसांमध्ये काँग्रेस पक्ष या भागातील पक्ष संघटनेसाठी यांचाही चांगला उपयोग करून घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. एकूण काँग्रेस पक्षाला राज्यात नवीन नायकत्व तसेच नवचैतन्य आले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मदतीने उत्तर कर्नाटकात पक्ष संघटना आणखीन मजबूत होणार हे मात्र निश्चितच.