Ghataprabha

आमदार अनिल बेनेकेनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद.

सर्वसामान्य माणसाप्रमाणे चहाच्या टपरीवर जाऊन चहा

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी : थंडीच्या दिवसांत गरमागरम चहाची टपरी दिसल्यावर कुणाचे मन आकृष्ट होणार नाही. पण, दस्तुरखुद्द बेळगाव शहराच्या आमदारांनी टपरीवर चहा घेण्याचा मित्रांसोबत मोह झाला आणि कोणतीही भीड न बाळगता त्यांनी टपरीवर जाऊन चहाचा चक्क आस्वाद घेतला. त्यांचे सहकारी आणि उपस्थित नागरिक एका आमदारांचा हा साधेपणा पाहून अचंबित झाले.

सर्व थाटमाटाला फाटा देत आमदार अनिल बेनके सर्वसामान्य माणसाप्रमाणे चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेण्याची हौस भागवून घेतली आणि आपण अजूनही जमिनीवरच आहोत, याचा परिचय दिला.यावेळी गिरीश धोंगडी,सुनील जाधव, शरद पाटील, संदीप हदगल, राजकुमार खटवकर, रवी कलघटगी,संजय जाधव, नितीन जाधव, यासह अन्य उपस्थित होते.