Kannada NewsKarnataka NewsLatest
गल्लीगल्लीत दगड मारतील सावधान : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा इशारा
प्रगतिवाहिनी न्युज / बेळगावी
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार कोरोनाविषयी व पॅकेज जाहीर करण्यात सम्पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अशाचप्रकारे केल्यास लोक गल्लीगल्लीत दगड मारण्याची वेळ येणार आहे, सावधान असा इशारा बेळगावी ग्रामीणच्या आमदार सौ लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या आमचे डबल इंजिनचे सरकार म्हणत आलेल्या भाजपाला डबल इंजिनचा अर्थ काय हे विचारावे लागेल.
आत्मनिर्भराबद्दल बोलणारे आता त्याविषयी बोलत नाहीत. गंगा नदी स्वच्छ करतो म्हणून सांगितले. पण आता पाहिल्यास कीतीतरी मृतदेह तरंगत आहेत. कुठे आहे यांचा धर्म, कुठे आहे यांची संस्कृती, लाज वाटत आहे असा असंतोष व्यक्त केला.
25 खासदार काय करीत आहेत. चक्रीवादळाची पाहणी केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला हजार कोटी रुपये पॅकेज जाहीर केले कर्नाटकाला काय दिले आहेत? सुरुवातिपासून आमच्यावर अन्याय करीत आले आहेत. महापुरात देखील पैसे दिले नाहीत, कोरोनात पैसे असो ऑक्सिजन देखील दिले नाहीत. प्रत्येक गोष्ट हायकोर्ट सांगावे लागत आहे. हायकोर्ट सुनावल्यानंतर ऑक्सिजन येत आहे. हे कसले डबल इंजिन सरकार असा सवाल हेब्बाळकर यांनी केला.
मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्याबद्दल फार आदर आहे. पण त्यांच्या प्रशासन कारभारशैली पाहून कंटाळा येत आहे. किती जण आरोग्य मंत्री आहेत? ऑक्सिजनला एक मंत्री, इंजेक्शनला एक मंत्री, बेडला एक मंत्री, कशासाठी कुणाला विचारायचे?
केवळ पंतप्रधानाना खुष करण्यासाठी कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवत आहेत. टेस्टिंग कमी करून कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखविले आहेत. पूर्वी 2 ते 2.5 लाख टेस्ट केल्या जात होत्या. आता 75 ते 80 हजार टेस्ट केल्या जात आहेत. त्वरित घरोघरी जाऊन टेस्टिंग करण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होणार आहे. खेड्यात प्रत्येक घरोघरी कोरोना पसरला आहे असे सांगितले.
बेळगाव इस्पितळास एका दिवशी कॉल केले असता एका डॉक्टराने आज 13 जण मरण पावल्याचे सांगून एक एक मृतदेह पाठवीत आहे असे सांगितले. त्याच रोजी सरकार जाहीर केलेल्या बुलेटिनमध्ये केवळ तीन जण मरण पावल्याचे दाखविण्यात आले. सर्व लपवून ठेवत आहेत. आमच्या मतदारसंघात रोज मरणाऱ्याची संख्या येते. पण येथे दिले जाणारी संख्या व मिळणारी संख्येत तफावत आहे. संख्या लपवून काय करणार आहेत असा संताप व्यक्त केला.
लसीकरण अहवाल द्या म्हणून जिल्हाधिकऱ्यांना विचारले पण आजपर्यंत मिळाली नाही. भाजपाचे आमदार असलेल्या भागाला जास्त लसीकरण करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार असलेल्या ठिकाणी लसीकरण कमी केले जात आहे. यात देखील पक्षपात केले जात आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे असे म्हणतात, खेड्यातील महिला असे रजिस्ट्रेशन करणे शक्य का ? घरोघरी जाऊन लसीकरण करुन रस्त्यावर मरण पावणाऱ्यांचे जीव वाचवा. कॉंग्रेसकडून 100 कोटी देतो म्हणून पत्र दिले तर आजून उत्तर नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्व सहकार्य देत आलो आहोत. पण सर्व कसे सहन करणे शक्य? असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सवाल केला.
पेरणी हंगाम येत आहे पण कोणतीही तयारी नाही, कृषी अधिकार्यांना विचारल्यास उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. बियाणे नाहीत, खत नाही, कुणालाही जबाबदारी नाही, केवळ हिरवे शाल घालून घेवून शपथ घेऊन काय उपयोग? शेतकऱ्यांना सुधारण्यासाठी 2 वर्षे कालावधी द्या. 10 लाखापर्यंत 0 व्याज दराने कर्ज द्यावे अशी मागणी केली.
काल मुख्यमंत्री 1250 कोटी रुपये पॅकेज जाहीर केले पण यातील विणकरांना व अनेक वर्गांना समाविष्ट केले नाही. मागच्यावर्षी विणकराकडून कपडे खरेदी करण्याचे सांगितले होते. पण काहीच केले नाहीत. कामगार कल्याण निधी वापरून यंदा पॅकेज जाहीर केले आहेत. हे खरे 450 कोटी पॅकेज मागच्यावर्षी जाहीर केलेले, या पॅकेजचे 10 लाख लाभार्थी पैकी केवळ 1 लाख लोकांना पैसे मिळाले आहेत. उर्वरित हिशोब देत नाहीत , देव यांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो लोक भाजपा सरकार तुम्हाला रक्षण करणार नाही. त्यांच्यवर विश्वास ठेवून अमूल्य जीवन गमावू नका, तुमच्या काळजीने तुम्ही रहा असे हेब्बळ कर सांगितल्या.
बेळगांव जिल्ह्यात चारजण मंत्री असून पालकमंत्री पद सांभाळण्याचे क्षमता नाही का? ते कुणीही आपला मतदारसंघ सोडून बाहेर येत नाहीत. एवढ्या मोठया जिल्ह्याला फ्लाईग पालकमंत्री दिले आहेत. ते येऊन परत बागलकोटला उडून जातात. कांही सांगून काय उपयोग. मगच्यावेळी महापुरात झालेल्या नुकसानाला पिडब्लूडी खात्याकडून पैसे विचारल्यास गोविंद कारजोळ एक पैसे दिले नाहीत. आशाकडून काय अपेक्षा करणार असा सवाल केला.
लॉकडाउन कडक अंमलबजावणी करावे. तसेच लोकांना योग्य मदत द्यावी. आर्थिक मदत न करता लॉक डाउन केल्या स लोक काय करणार असा प्रश्न हेब्बा ळ कर, ग्राम पंचायत मार्फत त्वरीत अर्थिक मदत वाटप करण्याचे काम करावे.उगिच डोळे पुसण्याचे काम करू नये. योग्य पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ