
प्रगतीवाहिनी न्युज / मुंबई –
महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून, महापुराच्या पाण्यामुळे एक बस वाहून गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात घडली आहे.
घटनास्थळी दाखल होऊन एनडीआरएफ पथक बचाव कार्य राबवित असून, आतापर्यंत 9 जणांची रक्षण केले आहे.
पावसाच्या जोरामुळे नद्या घोक्याच्या पातळीवर वाहत असून, उमरखेड शहरानजीकचा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर पाणी असताना देखील बस चालविल्याने, पाण्याच्या प्रवाहाने बस पुलावरून खाली कोसळली.
यामुळे प्रवासी पाण्यात वाहून गेले असून आतापर्यंत 9 जणांचे रक्षण करण्यात आले आहे. अद्यापही बचाव कार्य सुरू आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ