Kannada NewsKarnataka NewsLatest

जनतेच्या सहकारामुळे क्षेत्रातील प्रगती साध्य झाली -चेंनाराज हट्टीहोळी

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगाव ग्रामीण क्षेत्राच्या दोन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पंधरा लाख रुपयाचा चेक शुक्रवारी हस्तांतरित करण्यात आला.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आमदार निधीतून मदत करण्यात आली असून क्षेत्राच्या निलजी गावात अलोकिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दहा लाख रुपये तर सांब्रा गावच्या श्री कलमेश्वर मंदिरासाठी पाच लाख रुपयाचा चेक मंदीरीच्या समितीकडे हस्तांतरित करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा काँग्रेस प्रमुख  चेंनाराज हट्टीहोळी म्हणाले मंदिरे ही आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे गावांमध्ये जर मंदिर असेल तर गावात सुख-समृद्धी आणि शांती नांदते. यासाठी गावच्या जनतेनेही चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले.आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक स्वप्ने पाहिली असेल ते सदा या भागाच्या जनतेच्या सेवेसाठी सदैव तयार आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी जनप्रतिनिधी कार्यकर्ते व मंदिर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button