80 लाख रुपये निधीतून शाळा खोल्यांची निर्मिती : लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते भूमी पूजन
मतदारसंघातील कोणत्याही भागावर अन्याय न करता काम करण्याची ग्वाही
प्रगतीवहिनी न्युज / बेळगावी – 80 लाख रुपये निधीतून विविध शाळा खोल्यांच्या निर्मिती कामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते सोमवारी पार पडला.
विकासापासूनवंचीत असलेल्या बेळगावी ग्रामीण मतदारसंघात शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हेब्बाळकर यांनी शाळांचा विकास करण्यासाठी अनेक योजनांद्वारे निधी खेचून आणत आहेत. महापुरामुळे थोड्या प्रमाणात कामे होण्यास विलंब झाला असेल पण जिद्द न सोडता पुन्हा कामाला लागून मतदारसंघाचा विकास करीत आहेत.
मतदारसंघातील नागरिकांच्यात आत्मविश्वास भरून विकासाकडे वाटचाल करत असलेल्या आमदार हेब्बाळकर यांनी सोमवारी नाबार्ड निधीतील 80 लाख रुपये खर्चून गोजगा येथील मराठी सरकारी उच्च प्राथमिक शाळेला अतिरिक्त पाच खोल्याची निर्मिती, बेक्कीनकेरी येथे सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेस अतिरिक्त एक वर्ग खोली निर्मिती व तुरमुरी येथे सरकारी उच्च मराठी प्राथमिक शाळेला अतिरिक्त एक खोली निर्मिती कामाचा शुभारंभ केला.
मतदारसंघातील कोणत्याही भागावर अन्याय होऊ नये असे काम करीत आहे. नागरिक खरा विकास पहावेत असे काम केला आहे . महापूर , कोरोना संकट काळात न घाबरता काम करण्यास मला नागरिकांनी सहकार्य करत आहेत. पुढील काळात देखील असेच सहकार्य लाभल्यास मतदारसंघाचा लवकर विकास करून एक आदर्श मतदारसंघ करणे शक्य असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले
यावेळी त्या त्या गावातील ज्येष्ठ मंडळी, गटशिक्षणाधिकारी जुटनवर, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ