समाजकंटकांच्या कृत्याने शांतता भंग : मध्यस्थीत यशस्वी झाल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
प्रगतीवाहीनी न्यूज / बेळगांवी –
बेळगावी ग्रामीण मतदारसंघातील रणकुंडे गावात हिंदू मुस्लिम धर्मियांमध्ये समाजकंटकांनी द्वेष निर्माण करुन शांतता भंग झाल्याचे प्रकरण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मध्यस्थिने प्रकरण संपविण्यात आले आहे.
पोलीस व इतर अधिकाऱ्यांसोबत गावाला भेट देऊन लक्ष्मी हेब्बाळकर , दोन्ही समाजाची बैठक बोलवून चर्चा करून समस्या सोडविण्यात आली.
यापुढे आशा प्रकारच्या घटना होऊ नयेत. समाजकंटाकांचे ग्रामस्थानी ऐकू नये अशी विनंती हेब्बाळकर यांनी केली, याला सर्वांनी मान्य केले.
याचवेळी हुडा देवस्थानाला 50 हजार रुपये ( महाप्रसाद सेवेला 30 हजार रुपये व जीर्णोद्धारासाठी 20 हजार रुपये) लक्ष्मी हेब्बाळकरानी देवस्थान कमिटीला हस्तांतरीत केल्या.
यावेळी गावातील ज्येष्ठ पंच, हिंदू मुस्लीम नेते, निंगाप्पा पाटील, संजू पावशे, मलप्पा बी पाटील, भरमा पाटील, कलप्पा, रमेश पाटील, गुंडू पाटील, वैजनाथ गोजेकर, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, धनु पाटील, रमेश पाटील, गुंडू पाटील, बी वाय पाटील, नूर तहशीलदार, नियाज बुकारी, बाबूसाब सनदी, शकील जमादार, मलिक जमादार, हसन मुल्ला, दस्तगिर तहशीलदार, नियाज मुल्ला, पीडिओ प्रकाश कुडची, स्नेहल लोहार, मलाप्पा पाटील, मारुती हुरकडली, रामनिंग करलेकर व संबंधित अधिकारी व देवस्थान कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
” गावात सुमारे 75 वर्षांपासून हिंदू धर्माचे हुडा देवी देवस्थान आहे. पण त्याच्या शेजारी मुस्लिम मस्जिद देखील आहे. या गावात हिंदू मुस्लिम बंधूप्रमाणे जीवन व्यतीत करीत आहेत. कुणी कंटकांनी हुडा देवस्थानाची जागा मुस्लीम समाजाची असल्याचे सांगून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये दंगल घडविण्याचे षडयंत्र रचून गावात शांतता भंग केले आहेत. सदर बाबा माझ्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत गावात जाऊन हिंदू मुस्लीम नेत्याना बोलवून गावात अनुसूचित घटना घडू नये असे सांगून सामोपचाराने तोडगा काढला आहे ”
– लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ