Kannada NewsKarnataka News

ग्रामीण क्षेत्रात कॉंक्रीट रस्ता निर्माण कार्याला सुरुवात

प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: बेळगावी ग्रामीण  विधानसभा क्षेत्रात निरंतर कामे हाती घेतले जात असून क्षेत्रातील हिंडलगा आणि शाहूनगर या भागात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कॉंक्रीट रस्ता कामकाजाचे उद्घाटन करण्यात आले.
हिंडलगा गावातील मराठा कॉलनी मध्ये कॉंक्रीट रस्ता निर्मिती चे उद्घाटन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले या कॉलनीतील जनतेची फार दिवसाची मागणी यावेळी पूर्ण झाल्याचे समाधान निंबाळकर यांनी व्यक्त केले.
पंचायतराज अभियांत्रिकी विभागाच्यावतीने सुमारे वीस लाख रुपये निधीतून या रस्त्याचे निर्माण केले जात आहे यावेळी या भागातील नागरिक गाव प्रमुख युवा काँग्रेस राज्य प्रधान कार्य दर्शी मृणाल हेब्बाळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याप्रमाणे शाहूनगर येथील मराठा कॉलनी येथील कॉंक्रीट रस्ता निर्माणचे काम सुरू करण्यात आले या रस्त्यासाठी 20 लाखाचा निधी मंजूर झाला असून याचे लवकरच काम पूर्णत्वाकडे होईल यावेळी या भागातील रहिवाशांनी रस्ता निर्मिती ची सुरुवात केलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार व अभिनंदन केले

Related Articles

Back to top button