मतदारांना पंतप्रधान मोदींचा फोटो असलेली चिठ्ठी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आक्रोश
भाजप उमेदवाराविरुद्ध तक्रार करणार
प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; बेळगावी महानगरपालिका निवडणुकीमध्ये, पंतप्रधान मोदींचा फोटो असलेली मतदार क्रमांक चिठी देण्याबद्दल काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
वैभवनगरच्या वार्ड क्रमांक 45 च्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेली
मतदार क्रमांक चिठ्ठी मतदारांना देऊन, प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीसुद्धा प्रचार चालवला आहे,
त्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगावचे माजी नगराध्यक्ष, भाजपनेते बस्साप्पा चिकलदिन्नी यांनी या मतदार क्रमांक चिठ्ठ्या वाटल्या आहेत.
स्वतः वार्डामध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर, मतदारांना मोदींचा फोटो असलेली, मतदार क्रमांक चिठ्ठी देऊन भाजपला मत देण्यासाठी आकर्षित करणाऱ्या या, चिठ्ठ्या सापडलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ