Kannada NewsKarnataka News

बेळगावी पालिकेवर कोणाचेच नियंत्रण नाही -आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

   यावेळी महानगरपालिकेवर काँग्रेसचेच राज्य

          .
   प्रगतीवाहिनी वार्ता;  बेळगावी;   भाजपच्या आमदारानाच आयुक्तांच्या घरासमोर कचरा टाकण्याची परिस्थिती येते, यातून पालिकेवर कोणाचेच नियंत्रण नाही हे स्पष्ट होते, अशी टीका आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. महानगरपालिका  निवडणुकीत मतदान केल्यानंतर बोलताना, त्या म्हणाल्या की, केंद्र
आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. बेळगावीमध्ये भाजपचे दोन आमदार आहेत तरीही, भाजपचे आमदार पालिका आयुक्तांच्या घरासमोर कचरा आणून टाकतात, यावरून येथे काय परिस्थिती आहे ते दिसून येते.  स्मार्ट सिटी योजना कशी आहे हे सर्वांना माहीत आहे. हजार
कोटी रुपये या योजनेवर व्यर्थ खर्च झाला आहे. सिद्धरामय्या यांनी सरकारने तीन वर्षेपर्यंत पालिकेला प्रति वर्ष 120 कोटी रुपये अनुदान दिले होते. असे त्यांनी सांगितले.
    जनता आज महागाईने त्रस्त झाली आहे. भाजपवर विश्वास ठेवुन फसली आहे,  त्यामुळे यावेळी महानगरपालिका काँग्रेसमय होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मृणाल हेबाळकर, युवराज
 कदम आणि इतर उपस्थित होते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button