बोरगाव शहरातील 397 जणांना आहार किट वाटप
प्रगतीवाहिनी न्युज/ चिकोडी –
मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार गरीब लोकांच्या विकासासाठी जास्त प्राधान्य देत आहे. धर्मदाय खात्याने पंढरपूर, गुडापूर व श्रीशैल तीर्थक्षेत्रात कर्नाटक भवन निर्मितीसाठी प्रयत्न करीत असून, लवकरच भूमिपूजन केले जाईल असे धर्मदाय खात्याच्या मंत्री शशिकला जोले यांनी सांगितले.
शहरातील वाशिखान मंदिरात राज्य बांधकाम कामगार कल्याण खात्याच्यावतीने बोरगाव शहरात 397, बोरगाववाडी गावात 66, कसनाळ 84, ढोणेवाडी 150 असे एकूण 697 जणांना आहार किट वितरण करण्यात आले.
निपाणी मतदारसंघातील सर्व रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर झाला असून, पावसाळ्यानंतर काम सुरू करण्यात येईल. अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन वाढविण्यात आली आहे. तिरुपती येथे यात्री निवास निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. शहरातील अपंग, पत्रकार, बुथ सदस्य, अंगणवाडी, आशा, बांधकाम मजुरांसह हेस्कॉम कर्मचाऱ्यांना 397 जणांना आहार किटचे वाटप केले असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याचे मंत्री जोलेनी सांगितले.
भाजपा ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा सरोजनी जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हालशुगरचे संचालक रामगोंडा पाटील, नगरपंचायतीच्या माजी सदस्या मीना भादुले, राणी बेविनकट्टी, बिस्मिल्ला अफराज, बाबासो चौगुले, शेशु आयदमाळे, परवेज अफराज, शिवाजी भोरे, पंडित हिरेमनी, जमील अतार, महपती खोत, विष्णू तोडकर, रमेश मालगावे, आयुब मकानदार, अण्णाप्पा डकरे, फिरोज अफराज, धोंडिबा भोरे, नारायण आडेकर, काकाकासाहेब वाघमोडे आदि उपस्थित होते. आर.एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन तर राजू कुंभार आभार मानले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ