
प्रगतीवाहिनी न्युज / बेळगावी – आज अयोध्या श्री राम मंदिर शिलन्यासनिमित्त आज बेळगावी शहरात विविध ठिकाणी पूजा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच गजेश नंदगडकर यांच्याहस्ते शनिवर खूट येथील महादेव आरकेड येथे तर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने गोंधळी गल्ली हनुमान मंदिरात पूजा करण्यात आली. तसेच श्री राम मंदिर ट्रस्टवतीने शहापूर मिरापूर गल्लीतील राम मंदिरात पूजन पार पडले.
तसेच शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा, महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गजेश नंदगडकर, हनुमंत कागलकर, संतोष पेडणेकर, विजय कदम, शेष जवळकर,
राजन जाधव, चेतन नंदगडकर, लीना टोपणवर, सुवरणा पाटील, कांचन कोपर्डे, विनायक मुचंडिकर, शिवू बालाजी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, गलकीती पंच मंडळी, नागरिक उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ