
प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळच्या पदाधिकाऱ्यांच्या कडून यळूर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड सध्यास्थित आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे,निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून,निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव यांनी केले.
वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ‘पर्यावरणाचा -हास होत असून सध्या त्याचा परिणाम हा पर्जन्यमानावर ही झाला आहे.कारण,पाऊस हा टप्प्याटप्प्याने होत आहे.याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि शेतीवर होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी आपले कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करावे,’ असे आवाहन उपाध्यक्ष गिरीश धोंगडी यांनी केले आहे.
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्षलागवड महत्त्वाची असून हरित बेळगाव घडवण्यासाठी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सुरू केलेली मोहीम सर्व जनतेची चळवळ व्हावी, असे प्रतिपादन गजानन देवरमनी यांनी केले.
महामंडळाचे कायदा सल्लागार राम घोरपडे यांनी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हेमंत हावळ, वकिल शिवाजी शिंदे ,वकिल प्रवीण अगसगी,अश्वविनी लेंगडे,आनंद बडगीर,प्रवीण पाटील,शरद पाटील,योगेश कलघटगी, अर्जुन रजपूत,रवी कलघटगी,गजानन हांगीरगेकर, नितीन जाधव यासह अन्य गणेश भक्त उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ