Kannada NewsKarnataka News

ग्रामीण मतदार क्षेत्रामध्ये 7.55 कोटी रुपये खर्चाच्या तीन योजनांची सुरुवात

    तीन गावांमध्ये जलजीवन योजना प्रकल्पाचे उद्घाटन.

          शिंदोळीमध्ये  3.40 कोटी,  मारीहाळमध्ये 2.20 कोटी आणि बाळेकुंद्रीमध्ये 1.95 कोटी  रुपये खर्चाच्या योजनांचा प्रारंभ

    प्रगतीवाहिनी वार्ता;    बेळगावी;     बेळगावी ग्रामीण मतदार क्षेत्रातील शिंदोळी, मारीहाळ, आणि बाळेकुंद्री खुर्द गावातील जगजीवन मिशन योजनेच्या कामांना खासदार मंगला अंगडी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भूमिपूजनाने चालना दिली.
   शिंदोळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, ग्रामपंचायत अध्यक्ष मिलन मल्लारी,  उपाध्यक्ष गंगप्पा पुजेरी,  तसेच सदस्य बाबा गौडा पाटील, पिराजी अनगोळकर, शीला
 तिप्पण्णगोळ, वीरभद्रय्या पुजार, सागर मुचंडी, रेखा शहापुरकर, नागेंद्र कुरबर, सविता मुचंडी, सतीश शहापूरकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
  मारीहाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात, ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस नेते, माजी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील, युवराज कदम, बसवराज म्यागोटी, नागेश देसाई, समीर मुल्ला, प्रकाश तम्मण्णा,  मल्लारी आणि अन्य अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
      बाळेकुंद्री खुर्द येथे झालेल्या कार्यक्रमात युवराज कदम, नागेश देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांसह, नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button