प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: एकीकडे भारताच्या बॉर्डरवर चिनी सैनिकांची घूस पेठ तर दुसरीकडे कडाडून थंडी अशा परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे राहून सेवा बजावणारा बेळगाव जिल्ह्याचा सुपुत्र.
बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावचा युवक अरुण मिसाळे गेल्या साडे तीन महिन्यापासून सियाचीन ग्लेशियर मध्ये सेवा बजावत असून या ठिकाणी सध्या उणे 40 डिग्री तापमान आहे .
सियाचीन मध्ये सेवा बजावण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी असतो पण कोरोना च्या प्रादुर्भावामुळे त्यांचे सहकारी सैनिक सियाचीन मध्ये पोहोचू शकत नसल्याने अरुण मिसाळे या सैनिकाला आणखीन एक महिना येथे सेवा बजावावी लागणार आहे.
मार्च महिन्यात जेव्हा अरुण चालत सियाचेन पर्वत चढत असताना येथे उणे 50 ते 55 डिग्री तापमान होते आता सध्या तरी तापमान थोडे वाढले असून रात्रीच्या वेळी उणे 25 डिग्री सेल्सियस तापमान असते अशावेळी रात्री जर तहान लागली तर बर्फ गरम करून ते पाणी द्यावे लागते रात्री झोप तर येतच नाही येथे कधीकधी ऑक्सिजन मिळण्यासाठी मध्यरात्री दोन ते तीन वेळा पाणी पी यावे लागते असे सैनिक अरुण मिसाळे म्हणत होता.
चार दिवसा मागे भारत-चीन मध्ये झालेल्या गोळी बारापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर अरुण होते यांच्याही तुकडीला सतर्कतेचा इशारा आल्यामुळे कोणत्याही क्षणी चीन आपल्यावर धाड घालू शकते यामुळे या ठिकाणातील सर्व तुकड्या चीन चा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे समजते. अरुण चे वडील माजी सैनिक लक्ष्मण आणि आई जिजाबाई यांचा लहान मुलगा असलेला अरुण 2012 मध्ये मराठा लाईट इन्फंट्री द्वारे सैनिक भरती झाला. अरुण ची पत्नी सविता हिने गेल्या वर्षीच गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या भारत चीन यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे आणखीन काही काळासाठी तरी अरुण ला सियाचीन मध्येच सेवा बजावावी लागणार आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ