प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाने जोर घेतला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे महाराष्ट्रातील कोकण भागात जोरदार पाऊस पडत असून यामुळे चिकोडी तालुक्यातील पूल पाण्याखाली गेली आहेत. या वेळीही असाच पाऊस झाला तर महापूर येणार अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. कल्लोळ आणि येडूर तसेच दत्तवाड – मलिकवाड ला जोडणारी दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील समुद्र भागांमध्येही पावसाने जोर घेतला असून बहुतेक ठिकाणी दुकानांमध्ये, रस्त्यावरती पाणी शिरले आहे. काळी नदी भागातही पावसाचा पाण्याचा ओस वाढला असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
उडपी मध्येही पावसाने धुमाकूळ घातला असून गेल्या चोवीस तासात 65 मिलिमीटर पाऊस झाला आहे.ब्रह्मावर तालुक्यात वीज कोसळल्याने पाच घरे आणि दोन झोपड्यांना हानी पोहोचली असून सुमारे एक लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ