Kannada NewsKarnataka NewsLatest

राज्यात करोना वायरस मुळे नवीन 337 प्रकरणे,10 जणांचा मृत्यू

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी : कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच असून राज्यात शुक्रवारी नवीन 337 प्रकरणे आढळल्याचे दिसून आले तर कोरोनामुळे दहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 2943 तर मृत्यूची संख्या 124 वर पोहोचली आहे.
याबरोबरच 337 प्रकरणांपैकी 93 जण परराज्यातून तसेच अकरा जण बाहेर देशातून आले आहेत. या सर्वांना covid-19 कक्षाच्या प्रत्येक जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. 78 जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
337 प्रकारांपैकी बेंगलोर 138 कलबुर्गी 52 बल्लारी बत्तीस हासन 18 मंगळूर 13 उडपी 11 बिदर 10 मैसूर 6 बेळगाव एक अशी एकूण प्रकरणे समोर आले आहेत. राज्यातील 230 जणांना आतापर्यंत कोरोणा मुक्त होऊन बाहेर सोडण्यात आले आहे.

Home add -Advt

Related Articles

Back to top button