प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: भारताच्या सीमेवर चिन केलेला भ्याड हल्ल्याचा येडुर येथे तीव्र निषेध करण्यात आला यावेळी चिनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या प्रतिमेचे व उत्पादित वस्तूंचे दहन करण्यात आले त्यानंतर भारतीयांनी चिन उत्पादित वस्तूवर बंदी घालण्याचे आव्हान करण्यात आले
येडूर तालुका चिकोडी येथील शिवतेज सोशल फाउंडेशन व लक्ष्मण सूर्यवंशी मेमोरियल रुपिका को-ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त आश्रयाखाली श्रीशैल पिठाचे जगद्गुरु डॉक्टर
चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी चिक्कोडी चे खासदार अण्णासाहेब जोले बसव ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोले व शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक अजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली व चिनी वस्तू वर बहिष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेळी श्रीशैल पिठाचे जगद्गुरु स्वामीजी बोलताना म्हणाले की भारत मातेचे सर्वानी स्मरण करून भारत इन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून बोलताना म्हणाले की गेल्या काही वर्षांत चीनने भारताच्या सीमेवर वारंवार कुरघोड्या करत आहे अशा वेळी भारतात ही वस्तू खरेदी मुळे चीनची आर्थिक परिस्थिती मजबूत होत आहे हे लक्षात ठेवून हे लक्षात घेऊन प्रत्येक भारतीयाने चिनउत्पादित वस्तू वर बहिष्कार घालून चिनला धडा शिकवण्याचे आव्हान केले
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले बोलताना म्हणाले की चिनी सैनिकांच्या कृत्याचा निषेध करून पुढील काळात देशवासीयांनी चिनी उत्पा दकवस्तूंचा धिक्कार करून स्वदेशी वस्तू वापरण्याचे आव्हान केले यावेळी अमर बोरगावे श्रीकांत बेडगे मुकुंद जाधव श्रीकांत बोरगाव राजू दडे पोपट बोरगाव प्रकाश कोकणे सुनिल पवार दीपक इनामदार इरगोडा पाटील अण्णापा बोरगावे डॉक्टर सुकुमार चौगुला राजू हजारे संजय पाटील चंद्रकांत कमते मनोज खिचडे यांच्यासह शिवतेज फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते
फोटो
येडूर येथे आयोजित केलेल्या चिनिवस्तूंच्या बहिष्कार कार्यक्रमात देशी वस्तूच्या वापराची शपथ घेताना श्रीशैल पिठाचे जगद्गुरु खासदार अण्णासाहेब जोले बसव प्रसाद जोले अजय सूर्यवंशी अमर बोरगाव दीपक इनामदार व इतर मान्यवर
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ