प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू: राजधानी बेंगलोर येथे कोरोना थैमान घातले असून पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, बस ड्रायव्हर, कंडक्टर आता बीबीएमपी मध्ये काम करणाऱ्या पालिका कामगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
बेंगलोर मध्ये 19 जन पालिका कामगारांना कोरोना झाला असून नॅशनल कॉलेज ग्राउंड मध्ये हे कामगार काम करत होते.
या कामगारांपैकी सात जण पदरायांपूरा येथील असून बाकी च्या बारा जणांच्या घरांचा शोध सुरू आहे असे आरोग्य खात्याने सांगितले.
बसवणागुडी बेंगलोर वन येथे काम करणाऱ्या बंगलोर महानगरपालिकेच्या रेवेन्यू इंस्पेक्टरलाही कोरोना झाला आहे. यामुळे बसवणागुडी बेंगलोर वन ला भेट दिलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ