Kannada NewsKarnataka News

बाळेकुंद्री ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचार ,ग्रामपंचायत अध्यक्षांच्या विरोधात क्रिमिनल गुन्हा दाखल

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: बाळेकुंद्री ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून प्रादेशिक आयुक्त न्यायालयाने बाळेकुंद्री के एच ग्रामपंचायती अध्यक्ष यांच्याविरोधात क्रिमिनल गुन्हा दाखल केला असून सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस सरकारला केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव यांचा भाऊ प्रशांत अनंतराव जाधव हे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष असून त्यांनी 26 लाख 77 हजार 473 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी शिफारस सरकारकडे केली आहे.
याबरोबरच या प्रकरणाशी संबंधित पंचायत विकास विभाग अधिकारी पुनम घाडगे यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
काय आहे हे भ्रष्टाचार प्रकरण
बाळेकुंद्री केज ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव आणि पंचायत विकास विभाग अधिकारी पुनम यांनी मिळून चौदाव्या आर्थिक योजनेअंतर्गत सात लाख 37 हजार 42 रुपये खर्च केले असल्याचे तसेच यासोबत पाच लाख 37 हजार रुपयाला कोणतीही कागदपत्रे जमा केले नसल्याने आणि 2018 -19 या वर्षातील एस्क्रो खात्यातील 13 लाख 17 हजार 650 रुपये के टी पी कायद्यानुसार वापर केला नाही आणि ग्रामपंचायतीच्या कर वसुली तील 86 हजार 781 रुपये सरकारी खात्याला जमा न करता स्वतःच्या उपयोगासाठी वापरले आहे अशी एकूण 26 लाख 77 हजार 473 रुपयाचा ग्रामपंचायतीच्या अनुदानाचा दुरुपयोग केल्याचा जिल्हा पंचायत सीईओंनी आरोप केला होता.
आरोप इतका गंभीर असताना देखील क्रिमिनल गुन्हा दाखल केला नसल्याचे प्रादेशिक आयुक्तांच्या लक्षात येताच त्वरित क्रिमिनल गुन्हा दाखल करावा असे जिल्हा पंचायत यांना सूचना करण्यात आली होती याप्रमाणे जून 19 रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
याच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत अध्यक्षांना नोटीसही बजावण्यात आली होती पण याच्या एकाही नोटिशीला अध्यक्षांनी हजेरी लावली नव्हती मी तिसऱ्यांदा ग्रामपंचायत अध्यक्ष असून मला भरपूर याचा अनुभव आहे असे एकदा सांगितले होते तर मला कोणत्याही आर्थिक व्यवहारा बद्दल माहिती नसल्याचेही वही दिली होती याचा ठपका ठेवत असे दुहेरी उत्तर देणाऱ्या ग्रामपंचायत अध्यक्षांच्या विरोधात क्रिमिनल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पण ग्रामपंचायत अध्यक्षांनी मात्र राजकारणासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात चुकीचा आरोप केल्याचे सांगितले आहे पण यासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिला नसल्याने त्यांच्या ह्या स्पष्टीकरणावर बद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आता यांच्या सदस्यत्त्व रद्द होण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी शिफारस केली असून याबाबत सरकारचा निर्णय अपेक्षित आहे.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button