प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; बेळगावी महानगरपालिका निवडणूक मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी असताना; अबकारी पोलिसांनी ह्युंदाई कारमधून वाहतूक करण्यात येत असलेले; एक लाख
83 हजार रुपयांचे मद्य पकडले आहे.
विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे,अबकारी निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने मजगाव क्रॉसजवळ सापळा लावून तपासणी चालू केली होती. त्यावेळी GA 03 H 8644 क्रमांकाच्या ह्युन्दाई कारमधून वाहतूक करण्यात येत असलेले, गोव्यामध्ये विक्री करण्यासाठीचे, मद्य पकडले. तीन पोत्यामध्ये भरलेल्या व्हिस्कीच्या 915 प्लास्टिक बाटल्या (54 लिटर 900cc) त्या कारमध्ये मिळाल्या. या मद्याची किंमत 1 लाख 83 हजार रुपये आहे. अबकारी अधिकाऱ्यांनी मद्य व पाच लाख रुपयांची आय ट्वेंटी कार असा एकूण 6 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारमधून चोरटी वाहतूक करणारे सलीम अबूबकर शेख, वय 39 वर्षे, राहणार गुलमोहर सोसायटी, दंगल रोड. विकास नगर, किवळे, पुणे. आणि पृथ्वीराज विनायक चव्हाण, वय 21 वर्षे,साद्दींद्रायण दर्शन, 585 /15 देहू रोड पुणे. यांना अटक केली आहे.
अबकारी अपर आयुक्त डॉक्टर वाय मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा, उपअधीक्षक जनगौडा एस पाटील, यांच्या नेतृत्वात अबकारी निरीक्षक आर बी होसळ्ळी, यांनी कारवाई करून प्रकरण दाखल केले आहे. अबकारी उपनिरीक्षक अनिल रेनके डी सी ई कार्यालय, आणि शिपाई येस एन हुंडेकर, के बी कुरहट्टी, ड्रायव्हर यस बी शिवनगी आणि इतरांनी कारवाईत भाग घेतला.
मारीहाळ गावाला सांस्कृतिक भवन देणार ; लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ठोस आश्वासन
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ