प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी;
शुक्रवारी होणाऱ्या बेळगावी महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी गुरुवारी मतदानकेंद्रांना भेट देऊन, तेथील सोयी विषयी पहाणी केली.
बी के मॉडेल हायस्कूलमधील मस्टरिंग केंद्रातून, आज सकाळपासूनच निवडणूक कर्मचारी, मतदान यंत्रे आणि इतर सामग्री घेऊन जात होते. या सर्वांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
मतदान केंद्रातील मतदान यंत्रांची व्यवस्था, कोविड नियमांचे पालन करण्यासाठीची व्यवस्था, आणि मूलभूत सुविधा यांची त्यांनी पाहणी केली. नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
4,31,383 मतदार या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी 560 सेवारत आहेत. 2 लाख15 हजार 364 पुरुष मतदार असून दोन लाख 16 हजार 19 स्त्री मतदार आहेत.
58 वार्डमध्ये 402 मतदान केंद्रे आणि 13 उपकेंद्र मिळून एकूण 415 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचारी मिळून 5 जणाना नेमण्यात आले असून 20% अधिक (राखीव) मिळून एकूण 2500 जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालेल. निवडणूक प्रक्रिया न्यायोचितपणे आणि शांतीपूर्वक व्हावी म्हणून सर्व तयारी केली आहे. सर्व पात्र मतदारांनी न चुकता मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ