Kannada NewsKarnataka NewsLatest

कोरोना जागृकता -पोलीस खात्यासाठी नवीन गाईडलाईन्स

प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगळूरू: राज्यात कोरोनाने दिवसेंदिवस पाय पसरायला सुरुवात केली असल्यामुळे बेंगलोर शहर पोलीस कमिशनर भास्कर राव यांनी 50 वर्षावरील पोलिसांनी ठाण्यात येऊ नये असा आदेश केला आहे.
कोणाही पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जाऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी असे सांगितले आहे. याबरोबरच पोलिसांसाठी खालील सूचना जाहीर केले आहेत.
*समस्या काही असोत न घाबरता त्याला सामोरे जावे सरकार आणि जनता आपल्या सोबत आहे सर्व स्टेशन मधील 55 वर्षावरील पोलिसांनी घरीच राहावे बेंगलोर सोडता कामा नये, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष द्यावे.
*शक्यतो युवा होमगार्ड यांची नियुक्ती करावी याबद्दल डीसीपी मार्गदर्शन करतील असे त्यांनी सांगितले.
*कोणत्याही आरोपीला किंवा व्यक्तीला सोशल डिस्टन्स ठेवून विचारपूस करावी स्टेशनबाहेर एखादे शामियान लावण्याची व्यवस्था करावी
*होयसळ आणि चिता या दोन्ही वाहनांनी अनावशक फेरी मारू नये जर समस्या संबंधी कॉल आला तरच जावे.
*प्रत्येक ठाण्यात गरम पाणी, अंघोळ ,मास्क ,स्यानी टायझर तसेच फेस शील्डची व्यवस्था करावी
*आपण वापरत असलेली वाहने दररोज स्यानी  टाईज करावेत, ग्लोज वापरावेत.
*जनतेच्या रक्षणासाठी आपण ठामपणे उभे आहोत असा संदेश जनतेला द्यावा

मुख्यकार्यदर्शनी आपल्या पोलीस खात्याला सर्व ती सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button