Kannada News

जिल्हा पालकमंत्र्यांकडून होणार स्मार्ट सिटी आणि BUDA प्रगती आढाव्याची बैठक तर APMCL ला भेट

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी जून 27 तारखेनंतर बेळगाव दौरा करणार आहेत. जून 27 तारखेला सकाळी अकरा वाजता गोकाक ग्रह कार्यालयात सार्वजनिकांची सभा घेणार आहेत. जून 28 रविवारी सकाळी सहा वाजता गोकाक ग्रह कार्यालयात सार्वजनिकांकडून निवेदने घेणार आहेत.
29 तारखेला सोमवारी दहा वाजता बेळगावी शहरातील समर्थ अंग विकल संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या पौर कार्मिक व आशा कार्यकर्ता तसेच पोलीस अधिकाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर वितरण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
अकरा वाजता महानगरपालिकेच्या सभाग्रहात शहर विकास प्राधिकार तसे स्मार्ट सिटी योजनांच्या कामकाजाबद्दल माहिती घेतील.
दुपारी दोन वाजता शहरातील प्रवासी मंदिरात सार्वजनिकांकडून निवेदने स्वीकारतील, संध्याकाळी पाच वाजता गोकाक येथे जाणार आहेत.
जून 30 तारखेला मंगळवारी रामदुर्ग तालुका पंचायती मध्ये तेथील कामकाजाचा आढावा घेतील.

Related Articles

Back to top button