प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी:प्रत्येक रुग्ण हा डॉक्टर म्हणजे पृथ्वीतलावरील देव समजतो आणि त्या देवांचा सन्मान आज या ठिकाणी होत आहे याचा मला आनंद होत आहे असे विचार आदर्श सोसायटीचे चेअरमन एस एम जाधव यांनी काढले.
जायंट्स मेनच्या वतीने डॉक्टर्स दीनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संजय पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आदर्श सोसायटीचे चेअरमन एसएम जाधव, स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर,फेडरेशन अध्यक्ष अनंत जांगळे आणि सचिव विजय बनसुर होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलित करून जायंट्सची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरवात झाली.
प्रस्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत मदन बामणे यांनी केले.
यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी डॉक्टर्स दिनानिमित्त डॉ. रोहन भिसे, डॉ सी.जी.पाटील(खानापूर),डॉ मनोज पाटील, डॉ शैलेश उदपुडी आणि डॉ संपत पाटील यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
डॉक्टरांचा परिचय भरत गावडे, लक्ष्मण शिंदे,अनंत लाड,विजय बनसुर, अनिल चौगुले यांनी करून दिला.
स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर यांनी जायंट्सच्या कार्याची माहिती दिली.
डॉ शैलेश उदपुडी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच डॉक्टरी पेशा सांभाळताना काय काय अडचणी येतात याबद्दल माहिती दिली.
संजय पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास माजी अध्यक्ष सुनिल भोसले, अशोक हलगेकर, उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, व इतर जायंट्स सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पावशे यांनी तर आभार शिवराज पाटील यांनी मांडले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ