प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; बेळगावच्या आमदार आणि केपीसीसी प्रवक्ता लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, भाजप सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅसचे दर वाढवल्याबद्दल तीव्र टीका केली आहे. भाजप सरकार आल्यानंतर दररोज वाढणाऱ्या महागाईने जनसामान्यांना जीवन नकोसे केले आहे, अशी टीका केली आहे.
यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भाजप सरकार आल्यानंतर घरगुती गॅसचे दर 116 टक्क्यांनी वाढले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा 50 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे, असे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घरगुती गॅसचे दर 28 टक्क्यांनी आणि कच्च्या तेलाच्या किमती 32 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, त्यामुळे सगळेच दर आपोआपच कमी व्हायला पाहिजे होते, परंतु भारतातील भाजप सरकार दररोज दर वाढवीत आहे. कोणत्या कारणामुळे हे दर वाढवले जात आहेत याबद्दल सरकार काहीच स्पष्टीकरण देत नाही.
सरकार फक्त भांडवलदारांसाठीच काम करीत आहे, अशी टिका केली आहे. ‘अच्छे दिन’ च्या घोषणेवर विश्वास ठेवून जनता जनता मते देऊन पस्तावली आहे, यानंतर पुन्हा भाजपला पाठिंबा देऊ नये, असे झाले आहे. सरकारने कमीत कमी, शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे दर तरी वाढवायला हवे होते, पण तेसुद्धा केले नाही. गरीब जनता आणि शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर डोळ्यात पाणी येते, असे त्यांनी सांगितले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ