
जमीन वाद सोडवून देण्याचे सांगून फसवणूक केली आरोपीने
प्रगतिवाहिनी न्युज / बेंगळुरु – आपण आयएएस अधिकारी असल्याचे पोलिसांना खोटे सांगून त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रवीशंकर गुरुजी आश्रमास भेट देणाऱ्या आरोपीला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.
रविशंकर गुरुजी आश्रमाच्या जमिनीचा वाद सोडवून देण्याचे सांगितलेला तोतया आयएएस अधिकारी शशिर, गुरुजींच्या बाजूने मध्यस्थी करीत होता. पोलिसांना आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले होते.
मूळचा महाराष्ट्र राज्यातील असलेला शशिर, मागील तीन वर्षांपासून कगलीपूर येथे वास्तव्यास होता. संशय आल्यानंतर पोलिसांनी शशिरची कसून चौकशी केली असता आपण डिप्लोमा शिकत असून, आयएएस अधिकारी असल्याचे खोटे सांगितल्याचा आरोप कबूल केला.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ