
प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगलोरू:राज्यात महामारी कोरोणाने थैमान घातले असून राज्य सरकारने सरकारी नोकरांसाठी नवीन नियम अमलात आणला आहे. राज्य सरकारी नोकरी करणाऱ्यांनी आळीपाळीने नोकरीवर यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आता यापुढे आयटीबीटी नोकरदार सारखेच सरकारी नोकरदारांना ही काम करावे लागणार आहे आठवड्याच्या पाच दिवस काम करावे लागणार असून जुलै 10 पासून महिन्याच्या चारही शनिवारी सुट्टी असणार आहे.
प्रत्येक विभागाच्या कार्यक्षमता अनुसार आळीपाळीने काम करावे याचा निर्णय संबंधित कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी घेतील असे ते यावेळी म्हणाले.
ज्या ठिकाणी covid-19 ची प्रकरण जास्त आहेत अशा ठिकाणी सुट्टी लागू होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दररोज 50% सरकारी नोकर आळीपाळीने कामाला यावे असे सांगण्यात आले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ