शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योजना, शेतकऱ्यांच्या मुलांना विद्यावेतन
प्रगतीवाहिनी वार्ता; बेंगळुरू; शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आखलेल्या ‘मुख्यमंत्री रयत विद्यानिधी योजनेचे’ उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले. विधानसभेच्या बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या समारंभात, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी या योजनेचे उद्घाटन केले. केंद्रीय कृषी आणि रयत कल्याण मंत्री,
नरेंद्रसिंग तोमर यांनी, विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर थेट पैसे जमा करून या योजनेचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांचा विद्याभ्यास तसेच उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेतून 17 लक्ष मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये मदत होईल. केंद्रीय कृषी खात्याच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी विद्यार्थ्यांना सांकेतिकपणे विद्यावेतन वितरित केले.
या कार्यक्रमात कृषीमंत्री बी. सी. पाटील, मंत्री मंडळाचे सदस्य प्रभू चव्हाण, बी. सी. नागेश, सेंद्रिय शेती अधिकारी समितीचे अध्यक्ष एस आनंद, खासदार, आमदार यांनी समारंभात भाग घेतला.
बेळगावीमध्ये काँग्रेसच्या बलवर्धनासाठी, बेंगलोरमध्ये बैठक
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ