
प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी:उत्तर-मतदार क्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी महांतेश नगर येथील कन्नड उच्च प्राथमिक शाळेच्या बांधकाम निर्माणाचे भूमिपूजन केले.
यासंदर्भात बोलताना अनिल बेनके यांनी मागल्या वर्षी ही या शाळेच्या एका कोठडीचे निर्माण केले होते. यावर्षीही तळमजला व पहिल्या मजल्यावर आणखीन दोन खोल्या निर्माण केल्या जातील यासाठी 31 लाख रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
वांटमुरी कॉलनी ,श्रीनगर येथील आजूबाजूच्या मुलांना या शाळेमुळे शिकण्यासाठी मदत होत आहे, यामुळे येथे जितकी मदत हवी तितकी मदत आमदार या नात्याने मी करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत सहाय्यक अभियंता ब्रह्मानंद देसाई ,महानगरपालिका माजी सदस्य पुष्पा पर्वतराव, ईरया खोत, महालिंग तंगडगी, राजशेखर डोणी, दिग्विजय सिद्धनाल, किरण तूबकी, हनुमंत कागलकर, शाळेचे मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक या वेळी उपस्थित होते
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ